मुख्यालयात पोलिसांसाठी ग्रंथालय

By Admin | Updated: May 22, 2014 03:45 IST2014-05-22T03:45:54+5:302014-05-22T03:45:54+5:30

कळंबोलीमधील पोलीस मुख्यालयामध्ये कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे.

The Library for Police at the headquarters | मुख्यालयात पोलिसांसाठी ग्रंथालय

मुख्यालयात पोलिसांसाठी ग्रंथालय

नवी मुंबई : कळंबोलीमधील पोलीस मुख्यालयामध्ये कर्मचारी व त्यांच्या मुलांसाठी सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी सभागृह तयार करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलीस दलामधील अनेक कर्मचारी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. अनेक कर्मचारी खातेअंतर्गत परीक्षा देत असतात. या सर्वांना हक्काचे ग्रंथालय नसल्यामुळे कधी पालिकेच्या तर काहीवेळा उपलब्ध असेल त्या ग्रंथालयाचा आश्रय घ्यावा लागतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी कळंबोलीमधील नवीन मुख्यालयामध्ये सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. पोलिसांसह त्यांच्या मुलांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे. याठिकाणी सर्व प्रकारची पुस्तके व अभ्यासिकेची सुविधा आहे. याशिवाय विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. यासाठी नवीन मुख्यालयामध्ये विशेष सभागृह तयार करण्यात आले आहे. ग्रंथालय व प्रशिक्षण सभागृहाचे नुकतेच आयुक्त के. एल. प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथालयामध्ये पुस्तके अजून वाढविण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त फत्तेसिंह पाटील, उपआयुक्त अशोक मोराळे, विजय पाटील, एस. डी. ऐनापुरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Library for Police at the headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.