रेल्वेतील स्वयंचलित दरवाजांना लागणार लेटमार्क?

By Admin | Updated: October 3, 2014 02:31 IST2014-10-03T02:31:51+5:302014-10-03T02:31:51+5:30

लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करतानाच होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग रेल्वेकडून केला जात आहे.

Lettermark for the automatic doors of the railway? | रेल्वेतील स्वयंचलित दरवाजांना लागणार लेटमार्क?

रेल्वेतील स्वयंचलित दरवाजांना लागणार लेटमार्क?

>मुंबई : लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करतानाच होणा:या अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयोग रेल्वेकडून केला जात आहे. पश्चिम रेल्वेवर हा प्रयोग जरी यशस्वी झाला असला तरी प्रत्यक्षात हे दरवाजे लोकल गाडय़ांना लागण्यास लेटमार्क लागणार असल्याचे एका रेल्वे अधिका:याकडून स्पष्ट करण्यात आले. 
अपघातांना आळा घालण्यासाठी लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर दोन लोकल गाडय़ांच्या दोन डब्यांना असे स्वयंचलित दरवाजे बसवून त्याची चाचणीदेखील घेतली. हा प्रयोग यशस्वी झाला असून, त्याच्या आणखी चाचण्यादेखील घेणार आहेत. मात्र गुरुवारी सफाई अभियानानिमित्त रेल्वे राज्यमंत्र्यांनी चर्चगेट स्थानकासह सीएसटी स्थानकाला भेट दिल्यानंतर स्वयंचलित दरवाजाबाबत रेल्वे अधिका:यांनी त्याला लेटमार्क लागणार असल्याचे स्पष्ट केले. सध्या दोन बम्बार्डियर कंपनीच्या लोकल ताफ्यात येत असून, त्यामध्ये काही बदल करण्यात येत आहेत. अशा 70 लोकल टप्प्याटप्प्याने येणार असून, या लोकल ताफ्यात आल्यानंतर येणा:या नवीन लोकल गाडय़ांना स्वयंचलित दरवाजे बसवण्यात येतील, असे एका रेल्वे अधिका:याने सांगितले. त्यामुळे या गाडय़ांना लेटमार्क लागणार हे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
 
लोकलच्या दरवाजाजवळ लटकून प्रवास करताना लोकलमधून पडून अनेक प्रवाशांचे अपघात होतात. त्यामुळे अशा अपघातांना आळा घालण्यासाठी म्हणून रेल्वेकडून लोकलच्या डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला 
आहे.

Web Title: Lettermark for the automatic doors of the railway?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.