एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 07:57 IST2026-03-12T07:57:32+5:302026-03-12T07:57:45+5:30

एशियाटिक सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एशियाटिक टुमॉरो पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Let's give Asiatic Society its past glory: Sahastrabuddhe; The role of 'Asiatic Tomorrow' is clear | एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट

एशियाटिक सोसायटीला गतवैभव देऊ : सहस्त्रबुद्धे; 'एशियाटिक टुमॉरो'ची भूमिका स्पष्ट

मुंबई : एशियाटिक सोसायटीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील असून संस्थेचा परीघ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही एशियाटिक टुमॉरो पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विवेक गणपुळे व डॉ. प्राची मोघे उपस्थित होते. संस्थेत नवीन सदस्यत्व देण्याच्या मुद्यावरून बंगालप्रमाणे एसआयआर राबवण्याची गरज गणपुळे यांनी व्यक्त केली. सोसायटीची बहुचर्चित निवडणूक शनिवारी १४ मार्चला होत आहे. 

एका राजकीय पक्षाच्या बँक खात्यातून थेट एशियाटिक सोसायटीच्या खात्यात जमा केलेल्या ५० हून अधिक नव्या सदस्यांच्या शुल्कासंदर्भात कोणताही आक्षेप का नोंदवलेला नाही? त्यांचे हे मौन या कृत्याला समर्थन दर्शवते, असा आरोप यावेळी विरोधकांवर करण्यात आला. दरम्यान, सुमारे २१८  वर्षांचा इतिहास असलेली संस्था मुंबईसह राज्यातील महत्त्वाची संस्था आहे, प्रतीकात्मक वास्तू आहे, त्याचे पावित्र्य जपायला हवे, त्यामुळे निवडणूक नियमानुसार व्हावी ही आमची अपेक्षा, कोणतेही गैरप्रकार होता कामा नयेत, असे सहस्रबुद्धे म्हणाले.

कारभारातील वैचारिक अस्पृश्यता नष्ट करणार

१. सोसायटीच्या कारभारात सध्या सुरू असलेला गोंधळ, आर्थिक अनियमितता आणि वैचारिक अस्पृश्यता आदी घटक नष्ट करण्याकरिता कटिबद्ध असल्याचे सांगण्यात आले. 

२. आर्थिक दायित्वासह संसाधनांची उभारणी करणे, विस्तार आणि जनसंपर्काला प्राधान्य देणे, सर्वसमावेशकतेवर भर देणे, साहित्याच्या शास्त्रीय संरक्षणाला प्राथमिकता देणे, राष्ट्र प्रथम हे तत्त्व राबविण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

३. एशियाटिक टुमॉरो पॅनलमध्ये अध्यक्षपदासाठी डॉ. विनय सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष पदासाठी रमेश पतंगे, डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी, डॉ. नितीश भारद्वाज, डॉ. संजय देशमुख, सचिव पदासाठी विवेक गणपुळे यांचा समावेश आहे.

Web Title : सहस्रबुद्धे ने एशियाटिक सोसाइटी की महिमा बहाल करने का संकल्प लिया; 'एशियाटिक टुमॉरो' की भूमिका स्पष्ट की।

Web Summary : विनय सहस्रबुद्धे का लक्ष्य एशियाटिक सोसाइटी को पुनर्जीवित करना, इसके दायरे का विस्तार करना और अनियमितताओं को दूर करना है। 'एशियाटिक टुमॉरो' पैनल वित्तीय जिम्मेदारी, संसाधन जुटाने और समावेशी शासन को प्राथमिकता देता है। विपक्ष द्वारा चुनाव में अनियमितताओं का आरोप लगाया गया। पैनल में रमेश पतंगे, डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी और विवेक गणपुले शामिल हैं।

Web Title : Sahastrabuddhe pledges to restore Asiatic Society's glory; clarifies 'Asiatic Tomorrow' role.

Web Summary : Vinay Sahastrabuddhe aims to revitalize Asiatic Society, broaden its scope, and address irregularities. The 'Asiatic Tomorrow' panel prioritizes financial responsibility, resource mobilization, and inclusive governance. Election irregularities were alleged by opposition. The panel includes Ramesh Patange, Dr. Chandra Prakash Dwivedi, and Vivek Ganpule.

टॅग्स :Mumbaiमुंबई