होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 08:17 AM2020-12-01T08:17:53+5:302020-12-01T08:18:08+5:30

खर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर

Let it happen! Mithi, however, is ignored; The question of rehabilitation with cleanliness was like | होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे  

होऊ दे खर्च! मिठीकडे मात्र दुर्लक्ष; साफसफाईसह पुनर्वसनाचा प्रश्न जैसे थे  

googlenewsNext

मुंबई : मिठीने अनेक पावसाळे पाहिले. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगरच्या पुलावरून तर पाणीच पाणी वाहिले. होते नव्हते सारे गेले. संसार तर कित्येक वेळा उघड्यावर पडले. मिठीकाठच्या रहिवाशांना पुनर्वसनाच्या नावाखाली गाजर दाखखिले गेले. पण ना मिठी साफ झाली, ना रहिवाशांचे पुनर्वसन झाले. अशा प्रत्येक  पावसाळ्यात रहिवाशांना धडकी भरविणाऱ्या मिठीच्या साफसफाईच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च झाले असून, आता या खर्चात आणखी ५६९ कोटी रुपयांची भर पडणार आहे. तत्पूर्वी १ हजार ४०० कोटी खर्चूनही मिठीसह काठावरच्या रहिवाशांच्या पदरी निराशाच आली आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि मुंबई महापालिका मिठी नदीचे काम संयुक्तरीत्या करत आहे. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर मिठीची विकासकामे वेगाने हाती घेण्यात आल्याचा दावा दोन्ही प्राधिकरणाने केला. त्यानुसार, भिंत बांधणे, खोलीकरण करणे, रुंदीकरण करणे अशी कामे हाती घेण्यात आली. अशा कामांवर पर्यावरणतज्ज्ञांनी आक्षेप घेतले होते. 
कारण नदीला नदीसारखे वाहू द्यायचे असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र प्राधिकरणाने मिठी नदीचा नाला केला. मिठी नदीतला गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले तेव्हा या प्रश्नावर सातत्याने काम करणारे भाजपचे कलिना विधानसभा उपाध्यक्ष राकेश पाटील यांनी हा गाळ सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली काढावा, असे मत मांडले.

११ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मिठी नदीपात्रातील क्रांतीनगर, संदेशनगर येथील बाधित झोपडपट्टीधारकांना प्राधान्य देऊन त्यांचे त्वरित स्थलांतर करावे, असे निर्देश दिले. १९९५च्या कायद्यानुसार जे झोपडपट्टीधारक अपात्र होते  त्यांना नियमानुसार २०११च्या शासन निर्णयाप्रमाणे पात्र करून घेण्याची कार्यवाही करावी. झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करून येथील कामांना गती द्यावी, कुर्ला येथील बांधकाम मोकळ्या जागेत असून येथे १७,२०० घरे आहेत. यापैकी काही मोडकळीस आली असून काही जीर्ण झाली आहेत, या घरांसह मिठी नदीपात्रातील घरांना प्राधान्य देऊन त्यांचे स्थलांतर करावे, त्यांना इतर ठिकाणी घरे बांधून द्यावीत, असे निर्देश देण्यात आले होते.

प्रदूषित मिठी
मिठी नदी जेथून वाहते तेथील बहुतांश किनारी माेठ्या प्रमाणावर भंगाराची दुकाने, कारखाने, गॅरेजचा समावेश आहे. वांद्रे, कुर्ला, मरोळ अशा लगतच्या परिसरात ही बांधकामे असून, येथील रसायनमिश्रित पाणी मिठीत सोडले जाते. परिणामी मिठी स्वच्छ राहण्याऐवजी अधिकच प्रदूषित होत असल्याचे पाहायला मिळते.

मिठी नदीची कामे, सुशोभिकरण, रुंदीकरण, खोलीकरण, अतिक्रमण हटविणे, पर्यटनस्थळ

  • नदीचा उगम विहार व पवई जलाशयातून 
  • नदीचे पाणलोट क्षेत्र ७ हजार २९५ हेक्टर
  • उगम समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंच
  • महापालिकेच्या अधिपत्याखाली ११.८४ किमी लांबीचा भाग
  • एमएमआरडीएकडे ६ किमी लांबीचा भाग
  • नदी सीप्झ, मरोळ, अंधेरी, आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीखालून वाहते. त्यानंतर बैलबाजार, कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुलातून माहीम खाडीद्वारे १५ पुलांच्या खालून वाहत अरबी समुद्राला मिळते.

प्रकल्प पूर्ण कधी होणार?
पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे काम दरवर्षी केले जात असतानाच खोलीकरण आणि रुंदीकरणाचे कामही हाती घेण्यात आले. मात्र २६ जुलैच्या महापुराला १५ वर्षे लोटल्यानंतरही मिठीकाठचे प्रकल्प पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे. आता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ५६९ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. मात्र मिठी नदीचे हाती घेण्यात आलेले प्रकल्प पूर्ण कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कोणत्याच प्राधिकरणाकडे नाही.

कोणाकडे काय?
महापालिका - महापालिकेकडे विहार तलाव ते सीएसटी रोड हा भाग आहे. एमएमआरडीए - एमएमआरडीएकडे सीएसटी रोड पुलापासून माहीम कॉजवेपर्यंतचा भाग आहे.

२०२० आणि सफाई
मिठी नदीची सरासरी १०५ टक्के आणि मोठ्या नाल्याची सरासरी ११२.०० टक्के, छोट्या नाल्याचे सरासरी ८५ टक्के सफाई काम झाल्याचा दावा करण्यात आला.

Web Title: Let it happen! Mithi, however, is ignored; The question of rehabilitation with cleanliness was like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.