Leopard: गोरेगावात बिबट्याचा वावर, कुत्र्याला फरफटत नेलं, व्हिडीओ पाहून नागरिकांना भरली धडकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 21:06 IST2026-03-17T21:01:59+5:302026-03-17T21:06:18+5:30

Leopard In Goregaon: मुंबई -गोरेगाव पूर्व संकल्प सहनिवास आणि रहेजा हाईट्स मध्ये गेले २-३ दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Leopard: Leopard moves in Goregaon, snatches dog, citizens are shocked after watching the video | Leopard: गोरेगावात बिबट्याचा वावर, कुत्र्याला फरफटत नेलं, व्हिडीओ पाहून नागरिकांना भरली धडकी

Leopard: गोरेगावात बिबट्याचा वावर, कुत्र्याला फरफटत नेलं, व्हिडीओ पाहून नागरिकांना भरली धडकी

मुंबई -गोरेगाव पूर्व संकल्प सहनिवास आणि रहेजा हाईट्स मध्ये गेले २-३ दिवस बिबट्याचा वावर वाढल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तीन दिवसापूर्वी येथील संकल्प सहनिवासच्या प्रतिभा सोसायटीच्या मागे बिबट्याने एका कुत्र्याला पकडून नेले होते. त्याच दिवशी मध्यरात्री बिबट्या येथील नागरिकांना दिसला. तर काल रात्री रहेजा हाईट्सच्या हद्दीत बिबट्या येथील कुत्र्याला पकडून नेत असतांना नागरिकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या कुत्र्याला सोडून पळून गेला अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.

या भागात बिबट्याचा वावर वाढल्याने शासनाने ठोस उपाययोजना करण्याची आग्रही मागणी उद्धव सेनेचे स्थानिक आमदार सुनिल प्रभू यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या कडे केली.मंत्री महोदयांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य वनसंरक्षक  अनिता पाटील यांना या भागात बिबट्याचा वावर रोखण्यासाठी या भागात भेट देवून उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

आज दुपारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन आणि त्यांच्या टीमने या भागाला भेट दिली. येथे बिबट्याचा वावर कसा होतो यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहे. तर नागरिकांनी बिबट्या पासून आपले कसे संरक्षण करावे याबाबत येत्या शनिवार दि,२१ रोजी संकल्प सहनिवास येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती महाजन यांनी दिली.

दरम्यान उत्तर पश्चिम मुंबईचे शिंदे सेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी या घटनेची दखल घेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून येथील नागरिकांमधील बिबट्याची भिती दूर करण्यासाठी उपाययोजना करा. तसेच येथील आयटी पार्कच्या बांधकाम व्यवसायकाशी संपर्क साधून त्यांच्या हद्दीतील वाढलेले गवत काढावे, त्यांच्या हद्दीतील संरक्षक जाळीची उंची वाढवण्याच्या सूचना दिल्या.

Web Title : गोरेगांव में तेंदुए का आतंक: कुत्ता घसीटा गया, निवासी भयभीत।

Web Summary : गोरेगांव में तेंदुए की बढ़ती उपस्थिति से निवासियों में डर फैल गया है। इसने एक कुत्ते को घसीट लिया और आवासीय क्षेत्रों के पास देखा गया। अधिकारी स्थिति को संबोधित करने और नागरिकों की सुरक्षा सुनिश्चित करने के लिए कैमरे लगाने और जागरूकता शिविर आयोजित करने जैसे उपाय कर रहे हैं।

Web Title : Leopard terrorizes Goregaon: Dog dragged away, residents live in fear.

Web Summary : A leopard's increased presence in Goregaon has sparked fear among residents. It dragged away a dog and was sighted near residential areas. Authorities are taking measures, including setting up cameras and holding awareness camps, to address the situation and ensure citizen safety.