Join us  

विधानपरिषद निवडणूक: खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळेंना भाजपाचा धक्का, राजकीय पुनर्वसन नाहीच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 12:06 PM

खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

ठळक मुद्देनागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे राजकीय पुनर्वसन लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. रणजितसिंह मोहिते-पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र आहेत, तर गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्याविरोधात बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती, प्रवीण दटके हे नागपूरचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक आहेत, त्यांचे वडील प्रभाकरराव दटके हे भाजपाचे नेते होते. अजित गोपछेडे हे तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचे कार्यकर्ते आहेत. या चारही नेत्यांना भाजपाकडून संधी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता २१ मे रोजी होणारी विधान परिषदेच्या ९ जागांसाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले जात होते.दरम्यान, सध्याच्या समीकरणांनुसार शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, काँग्रेसचा एक असे मिळून महाविकास आघाडीचे ५ आणि भाजपाचे तीन आमदार थेट निवडून येऊ शकतात. मात्र नवव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. भाजपानं चौथा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानं आता चूरस निर्माण होणार आहे. तर आता काँग्रेसनेही दुसरा उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उतरवण्याची तयारी केली आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतून बचावलेल्या मजुराने सांगितलं नेमकं काय घडलं!

Coronavirus: औरंगाबादमधील रेल्वे अपघाताची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल; रेल्वे मंत्र्यांना दिल्या सूचना

लॉकडाऊनची भीषणता! औरंगाबादजवळ रेल्वे रुळावर झोपलेले १६ मजूर चिरडून ठार

'गावी जाऊ इच्छिणाऱ्या, शहरात अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार'

Coronavirus: आता पोस्टानं होणार कोरोना टेस्टिंग किट्सची डिलिव्हरी; ICMRनं केला करार

Coronavirus: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची भीती, खासगी नोकर निघाला संक्रमित

टॅग्स :एकनाथ खडसेपंकजा मुंडेविनोद तावडेविधान परिषद निवडणूक