"जपानमध्ये स्वेटरची किंमत विचारली, बायको म्हणाली,...; नरहरी झिरवळ यांनी सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:38 PM2023-04-24T17:38:59+5:302023-04-24T17:48:25+5:30

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते 23 एप्रिल या काळात जपानमध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता.

Legislative Assembly Vice President Narahari Ziraval shared his experience during his visit to Japan | "जपानमध्ये स्वेटरची किंमत विचारली, बायको म्हणाली,...; नरहरी झिरवळ यांनी सांगितला अनुभव

"जपानमध्ये स्वेटरची किंमत विचारली, बायको म्हणाली,...; नरहरी झिरवळ यांनी सांगितला अनुभव

googlenewsNext

मुंबई- राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे ११ ते 23 एप्रिल या काळात जपानमध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यादरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी यांचा विमानतळावरील एक फोटो व्हायरल झाला होता. त्यांच्या साधेपणाचा कौतुक अनेकांनी केलं होतं, आता जपान दौऱ्यावरुन झिरवळ भारतात परत आले आहेत, जपानचा दौरा कसा झाला याबाबत आमदार नरहरी झिरवळ यांनी अनेक आठवणी सांगितल्या. यात त्यांनी जपानमधील एका दुकानातील स्वेटर संदर्भात एक किस्सा सांगितला आहे. 

'झोळी लटकवून निघून जाल...' उद्धव ठाकरेंच्या PM मोदींवरील टीकेला एकनाथ शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर

नरहरी झिरवळ म्हणाले, जपान दौरा हा माझ्या आयुष्यातील नाही, तर माझ्या पूर्वजांच्या जीवनातील हा अनुभव आम्हाला मिळाला. मी माझा पेहराव बदलणार नाही असं अगोदरच सर्वांना सांगितलं होते. माझी पत्नीने १० तासाचा विमान प्रवास पहिल्यांदाच केला. आम्ही जपानमध्ये प्रत्येकाला शिस्त लावली आहे. आपण जपानच्या २५ ते ३० वर्ष पाठिमागे आहोत.   भारतातील अनेकजण जपानमध्ये नोकरीला आहेत. 

" मी माझ्या पत्नीसोबत एका दुकानात स्वेटर पाहण्यासाठी गेलो, तिथे आम्हाला एका स्वेटरची किंमत २८ हजार रुपये सांगितली, ही किंमत ऐकून बायको म्हणाली, एवढ्या पैशात घरातील सर्वांना स्वेटर घेऊनही पैसे उरतील. आपल्या नाशिकला १२०० रुपयात स्वेटर मिळतो, आणि आम्ही दुकानातून काहीच न घेता बाहेर पडलो, असा अनुभव नरहरी झिरवळ यांनी सांगितला. यावरुन त्यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. 

नरहरी झिरवळ यांनी जपान मधील शिस्तही सांगितली. जपानमधील लोकांनी स्वत: शिस्त लावून घेतली आहे. त्यामुळे तेथील गोष्टीत कायद्याच महत्व समजते. तेथे कोणत्याही सिग्नलवर वाहनांची गर्दी नसते. तेथे कोणतेही वाहन सिग्नल तोडताना आम्हाला दिसले नाही असंही झिरवळ म्हणाले.  

Web Title: Legislative Assembly Vice President Narahari Ziraval shared his experience during his visit to Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.