डावखुरा दिन विशेष: 'डावखुरे असणे हा काही आजार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 01:41 AM2020-08-13T01:41:19+5:302020-08-13T01:41:25+5:30

डावखुऱ्या मुलांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांबाबत अद्यापही स्पष्टता नाही

left handers day 'Being left-handed is not a disease' | डावखुरा दिन विशेष: 'डावखुरे असणे हा काही आजार नाही'

डावखुरा दिन विशेष: 'डावखुरे असणे हा काही आजार नाही'

Next

मुंबई : डावखुरे असणे हे वेगळे किंवा कमीपणाचे समजले जाते. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. डावखुरे असणे हा आजार नसून नैसर्गिक स्थिती आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी १३ आॅगस्ट ‘डावखुरा दिना’च्या निमित्ताने (वर्ल्ड लेफ्टहँडर्स डे) मांडले आहे.

समाजातील सर्व स्तरांमध्ये डाव्या लोकांच्या समस्या पोहोचवल्या जाव्यात, त्यांना योग्य त्या सुविधा, अगदी शाळा-महाविद्यालयांमध्ये उपलब्ध व्हाव्यात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डावखुरेपणा ही व्याधी नाही, असे असणे हे पूर्णत: सामान्य आहे हे वास्तव पालकांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून एखाद्या मुलाचे दडपणामुळे भावविश्व कोमेजले जाऊ नये, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी मढवी यांनी सांगितले.

डावखुऱ्या मुलांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधांबाबत अद्यापही स्पष्टता नाही. उदा. शाळा, महाविद्यालयांत, कार्यालयांत बैठकीची व्यवस्था असमाधानकारकच असते. संगणकांच्या माऊसवरील इंडेक्स फिंगर बदलणे, डावखुऱ्यांसाठी खास पेन सहजपणे उपलब्ध होणे आदींबाबतीत अद्यापही आपण मागेच आहोत. मुंबई, औरंगाबाद आणि कोल्हापूर येथे डावखुºया व्यक्ती, विद्यार्थी यांच्याकरिता काही संस्था कार्यरत आहेत. अडचणींचा निपटारा करणे, मार्गदर्शन करणे हे संस्थांच्या माध्यमातून केले जाते, अशी माहिती असोसिएशन आॅफ लेफ्टहँडर्सचे डॉ. राजकुमार शाह यांनी दिली.

वस्तू बनविल्या जातात त्या उजव्यांची सोय लक्षात घेऊनच. कात्री, वाद्य जसे गिटार, बासरी, व्हायोलिन इ. दुचाकी, चारचाकी वाहनांचे आॅपरेटिंग हे उजव्या हातांच्या लोकांचाच विचार करून तयार केले आहे. गेल्या काही वर्षांत मात्र विदेशात डाव्यांचा विचार करून यंत्र आणि वस्तू बनविल्या जात आहेत. आपल्या देशात मात्र अजून यावर काही काम नाही, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरेश गोस्वामी यांनी सांगितले़
 

Web Title: left handers day 'Being left-handed is not a disease'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.