"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना..."; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला

By मुकेश चव्हाण | Published: February 6, 2021 06:31 PM2021-02-06T18:31:29+5:302021-02-06T18:46:47+5:30

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत.

"Leaving our area and talking about other topics ..."; Sharad Pawar's advice to Sachin Tendulkar | "आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना..."; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला

"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना..."; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला

googlenewsNext

पुणे/मुंबई - मास्टरब्लास्ट भारतरत्न आणि माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यानं पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला अनुसरुन पॉप स्टार गायिका रिहाना हिने केलेल्या ट्विटला अप्रत्यक्षपणे उत्तरच सचिनने आपल्या ट्टिटमधून दिलं होत. सचिनच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्याच येत आहे. 

केरळमधील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या लाकडी कटआऊटला काळ्या ऑईलने अंघोळ घालून सचिनच्या ट्विटचा निषेध नोंदवला. केरळमधील कोची येथे हा प्रकार घडला होता. याबद्दल माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी भूमिपुत्राचा, महाराष्ट्र भूषण आणि देशाचं भूषण असलेल्या सचिनचा हा अवमान सहन करणार का? असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला आहे. याचदरम्यान सचिन तेंडुलरकच्या विधानाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

सचिन तेंडुलकरने केलेल्या शेतकऱ्याबाबतच्या विधानानंतर अनेक सामान्य लोक आक्रमक होत आहेत. त्यामुळे "आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना सचिन तेंडुलकरने काळजी घ्यावी, असा माझा सल्ला राहिल, असं शरद पवारांनी सांगितलं. तसेच इतके दिवस शेतकरी जर रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहीजे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत आता आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. हे खरं तर चांगलं नाही, असं शरद पवारांनी सांगितलं. 

नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुढाकार घ्यायला हवा. कदाचित त्यातुन मार्ग निघण्याची शक्यता आहे, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोररण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असंही शरद पवारांनी केंद्र सरकारला सांगितले आहे. 

सरकार तिला उत्तर का देतंय?- राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला

"कोण कुठली रिहाना? कोण बाई आहे ती? तिला का इतकं महत्वं दिलं जातंय? तिनं ट्विट करायच्याआधी तिला कुणी ओळखत तरी होतं का? आणि अशा व्यक्तीनं ट्विट केल्यानंतर आपल्या देशातील भारतरत्नांना सरकारनं ट्विट करायला लावणं हे बरोबर नाही", असं मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणाले. तसेच  कृषी कायदे फायद्याचे आहेत. पण ते फक्त एक-दोघांसाठी फायदेशीर ठरू नयेत इतकंच लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे कृषी मंत्री आणि आंदोलकांमध्ये चर्चेनं तोडगा निघत नसेल. मग पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना एक फोन करुन विषय मिटवून टाकावा, असं राज ठाकरे म्हणाले. 

सचिन तेंडुलकरचं ट्विट

आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं.  

समीर विध्वंस यांची टीका

"सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो. तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता. आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!" असं ट्विट दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी केलं आहे.  

Web Title: "Leaving our area and talking about other topics ..."; Sharad Pawar's advice to Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.