मुंबई - पश्चिम रेल्वेमार्गावरील विरार-चर्चगेट जलद लोकलमध्ये रविवारी पावसाच्या पाण्याची गळती झाली. यामुळे अनेक प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला. ही चित्रफीत एका प्रवासाने कॅमेरामध्ये कैद केली आहे.
रविवारी सकाळी ५:०८ च्या विरार-चर्चगेट जलद लोकलच्या २०६५ बी या डब्यामध्ये पावसाच्या पाण्याची गळती झाली. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधून भिजतच प्रवास करावा लागला. याच्या संतप्त प्रतिक्रिया लोकल प्रवाशांत उमटल्या. रेल्वे प्रशासनाने या गळतीबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पुढील २४ तास ऑरेंज अलर्ट
राज्यात पुढील २४ तासासाठी पुणे घाट भागात (Red Alert) रेड अलर्ट देण्यात आला असून पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट (Orange ALert) देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याकडून १७ ते २१ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतही पावसाची संततधार कोसळत आहे.