Join us

अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 07:24 IST

मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. याचा फटका मेट्रोलाही बसला.

मुंबई : अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो २ अ मार्गिकेवरील अंधेरी पश्चिम स्थानकातील पावसाच्या तयारीचा फोलपणा सोमवारी समोर आला. गळती होणारे पाणी सर्वत्र पसरू नये म्हणून महामुंबईमेट्रो रेल्वे संचलन मंडळाने (एमएमएमओसीएल) रंगीबेरंगी बादल्या स्थानकात मांडल्या आहेत. त्यामुळे एमएमएमओसीएलवर टीका होत आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. याचा फटका मेट्रोलाही बसला. मेट्रो २ अ मार्गिकेच्या अंधेरी स्थानकात गळती सुरू झाली. याची छायाचित्रे सोमवारी समाजमाध्यमावर प्रसारित झाली. ही मेट्रो मार्गिका नवीन असून, गेल्यावर्षीही या स्थानकावर गळती सुरू होती. त्यावेळी एमएमएमओसीएलने सर्व कामे केल्याचा दावा केला होता.मात्र, यंदाही गळती होत असल्याने कामांच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहे. आता प्रवाशांनी मेट्रोमध्ये जाताना छत्री न्यावी का? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. याबाबत एमएमएमओसीएलकडे विचारणा केली असता कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

टॅग्स :मेट्रोमुंबईअंधेरी