Join us  

सर्वपक्षीय नेत्यांनी महाराष्ट्राला दिला रक्ताचं नातं जोडण्याचा शब्द; ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महारक्तदान मोहिमेत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 7:17 AM

‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महारक्तदान मोहिमेचे. ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांनी बोलावलेल्या झूम मीटिंगमधून या सर्व नेत्यांनी हसत-खेळत चर्चा केली.

मुंबई : विरोधी पक्षनेते भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, नगरविकासमंत्री शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख हे सगळे नेते एका व्यासपीठावर आले. त्यांच्यात खेळीमेळीने चर्चा झाली. राज्यातील जनतेशी रक्ताचं नातं जोडण्याचा संकल्पही त्यांनी सोडला. महाराष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व नगरविकास विभागाचे सर्व कर्मचारी अधिकारी या मोहिमेत पूर्णपणे सहभागी होतील, असा विश्वास यावेळी तिन्ही विभागांच्या मंत्र्यांनी दिला.

निमित्त होते ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महारक्तदान मोहिमेचे. ‘लोकमत मीडिया’चे चेअरमन विजय दर्डा यांनी बोलावलेल्या झूम मीटिंगमधून या सर्व नेत्यांनी हसत-खेळत चर्चा केली. राज्यातील महाराष्ट्रातल्या जनतेला रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी सगळ्यांनी पक्षीय झेंडे बाजूला ठेवून रक्तदान मोहिमेत सहभागी होण्याची ठोस भूमिकाही मांडली. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत २ जुलैपासून ‘लोकमत’ने महाराष्ट्रभर रक्तदान मोहिमेचे आयोजन केले आहे. त्यासाठी ज्येष्ठ मंत्री, विविध अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक शनिवारी पार पडली. 

लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित रक्तदान मोहिमेच्या तयारीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, सार्वजनिक आरोग्य मंत्री व राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे, आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अमित देशमुख, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा आणि लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा छायाचित्रात दिसत आहेत.

संपूर्ण बैठक लोकमत यूट्युबवर 

लोकमत महारक्तदान मोहिमेसाठी आयोजित करण्यात आलेली ही झूमवरील बैठक लोकमत यूट्युब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. 

 

टॅग्स :लोकमतरक्तपेढीमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीस