Join us  

विधि, बीपीएड सीईटीसाठी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन, आयडॉलकडून नवीन तारखा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 9:36 AM

विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

मुंबई : आयडॉलच्या पदव्युत्तर शाखेची परीक्षा २ नोव्हेंबरला होणार आहे. मात्र त्याच दिवशी विधि शाखेची सीईटी आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आयडॉलने २, ३ व ४ नोव्हेंबर २०२० रोजी होणाऱ्या विधि व बीपीएड या सीईटी देणाऱ्यांसाठी ६, ७, ९ नोव्हेंबर २०२० या दिवशी स्वतंत्र परीक्षांचे आयोजन केले आहे.विद्यार्थ्यांनी त्यांचे नाव, परीक्षेचे नाव, आसन क्रमांक, ईमेल, मोबाइल क्रमांक व पेपरचे नाव इत्यादी माहिती मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) दिलेल्या onlineexam2020@idol.mu. ac.in या ईमेलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान, दोन्ही परीक्षा एकत्र येत असल्याने तारखांमध्ये बदल करण्याची मागणी विद्यार्थ्यांसह मनविसेचे मुंबई विद्यापीठ अध्यक्ष अ‍ॅड. संतोष धोत्रे यांनी केली होती. 

टॅग्स :परीक्षामुंबईमहाराष्ट्र