मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज, राम नवमी शोभायात्रेत तणाव
By मनीषा म्हात्रे | Updated: March 30, 2023 23:00 IST2023-03-30T22:58:57+5:302023-03-30T23:00:42+5:30
शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे.

मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात पोलिसांकडून लाठीचार्ज, राम नवमी शोभायात्रेत तणाव
मुंबई - रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. याच शोभायात्रेत मालवणी गेट क्रमांक पाच जवळ दोन गटांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.
शोभा यात्रेदरम्यान काही लोकांकडून दगड फेक आणि चप्पल फेक करण्यात आली, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. सध्या मालवणी परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.