Lata Mangeshkar: “रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे”; लता मंगेशकरांनी सांगितला होता खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 14:56 IST2022-02-06T14:54:38+5:302022-02-06T14:56:28+5:30
Lata Mangeshkar: खुद्द लता मंगेशकरांनी याबाबतचा खास किस्सा चाहतांसोबत शेअर केला होता.

Lata Mangeshkar: “रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे”; लता मंगेशकरांनी सांगितला होता खास किस्सा
मुंबई: भारतरत्न, गानकोकिळा, गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. कोरोना आणि न्युमोनिया झाल्यामुळे लता दीदींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी लता दीदी लता दीदींचा कोरोनामुक्त झाल्या होत्या. लता दीदींच्या निधनाने संपूर्ण विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकविध क्षेत्रातील मान्यवर, दिग्गज, कलाकारमंडळी लता दीदींच्या प्रभुकुंज या निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेत आहेत.
अशातच लता मंगेशकर यांच्यासंदर्भातील अनेक आठवणी मान्यवर शेअर करताना दिसत आहेत. जवळपास ४ पिढ्यांना लता मंगेशकरांच्या गीतांनी रसिकांना, श्रोत्यांना पूर्णानंद दिला. लता मंगेशकरांनी अगदी लहान वयातच आपल्या गायनाच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. लता दीदींनी पहिल्यांना रेडिओसाठी गायलेल्या गीताला डिसेंबर २०२१ मध्ये ८० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने लता मंगेशकर यांनी ट्विट करून त्या आठवणींना उजाळा दिला होता.
रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे
लता मंगेशकरांनी १६ डिसेंबर २०२१ रोजी ट्विट करून चाहत्यांसोबत याबाबतची आठवण शेअर केली होती. देवाचा, पूज्य माई आणि बाबांचा आशीर्वाद घेऊन १६ डिसेंबर १९४१ रोजी मी पहिल्यांदा रेडिओसाठी स्टुडिओमध्ये जाऊन २ गाणी रेकॉर्ड केली होती. या गोष्टीला आता ८० वर्षे पूर्ण झाली. या ८० वर्षांत चाहत्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले, आशीर्वाद दिले. तुम्हा सर्वांचे हे प्रेम यापुढेही मला कायम मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे ट्विट लता मंगेशकर यांनी केले होते.
दरम्यान, लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर रोजी १९२९ रोजी झाला. लता मंगेशकरांनी ३६ भाषांमध्ये तब्बल ५० हजार गाणी गायली आहेत. हा एक रेकॉर्ड गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आलेला आहे.
16 दिसम्बर 1941 को,ईश्वर का पूज्य माई और बाबा का आशिर्वाद लेकर मैंने रेडीओ के लिए पहली बार स्टूडीओ में २ गीत गाए थे.आज इस बात को 80 साल पूरे हो रहे हैं.इन 80 सालों में मुझे जनता का असीम प्यार और आशिर्वाद मिला है,मुझे विश्वास है की आपका प्यार,आशिर्वाद मुझे हमेशा यूँही मिलता रहेगा. pic.twitter.com/YwFTkkPMnb
— Lata Mangeshkar (@mangeshkarlata) December 16, 2021