Join us

'देशात दुखवटा असताना मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी कार्यक्रम घेणे हा लता मंगेशकर यांचा अपमान, मोहित कंबोज यांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 15:16 IST

Mohit Kamboj News: लता मंगेशकर यांचा श्रद्धांजली म्हणून देशात दोन दिवसांच्या दुखवट्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी सांगलीमध्ये राज्य सरकारमधील मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी कार्यक्रम घेतला, हा लता मंगेशकर यांचा अपमान आहे असा आरोप भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

मुंबई - विश्वविख्यात गायिका, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे देशात दु:खाचे वातावरण होते. तसेच लता मंगेशकर यांचा श्रद्धांजली म्हणून देशात दोन दिवसांच्या दुखवट्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी सांगलीमध्ये राज्य सरकारमधील मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी कार्यक्रम घेतला, हा लता मंगेशकर यांचा अपमान आहे असा आरोप भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केला आहे.

जयंत पाटील आणि विश्वजित कदम हे एखा कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावरून मोहित कंबोज यांनी ही टीका केली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा असताना मंत्री कार्यक्रम घेतात. राज्यातले मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत का? असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला. जर कार्यक्रम घेतला नसता तर काय फरक पडला असता? आता ह्या मंत्र्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज भारतीय यांनी केली. 

टॅग्स :लता मंगेशकरजयंत पाटीलविश्वजीत कदम