Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर शेवटची लोकल आज १०.५० वाजता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:43 IST2025-01-25T09:48:38+5:302025-01-25T10:43:04+5:30
Mumbai Local Mega Block Update: मध्य रेल्वे मार्गावरील कर्नाक पुलाच्या कामासाठी रेल्वेकडून शनिवारी २५ जानेवारीला रात्री ११:३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ५:३० वाजेपर्यंत ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर शेवटची लोकल आज १०.५० वाजता
मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील कर्नाक पुलाच्या कामासाठी रेल्वेकडून शनिवारी २५ जानेवारीला रात्री ११:३० वाजल्यापासून रविवारी सकाळी ५:३० वाजेपर्यंत ६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मेन लाइनवर सीएसएमटीहून धिम्या मार्गावर रात्री १०:५० वाजता टिटवाळा लोकल तर जलद मार्गावर १०:४७ वाजता कसारा लोकल शेवटची असणार आहे. तर हार्बरवर पनवेलसाठी १०:५८ व गोरगावसाठी १०:५४ वाजता शेवटची लोकल असणार आहे. तसेच ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी असे तीन दिवसही मध्यरात्रीही ब्लॉक घेतले जाणार आहेत.
कुठे आहे ब्लॉक?
अप आणि डाउन धिम्या मार्ग-भायखळा ते सीएसएमटी
अप आणि डाउन हार्बर मार्ग - वडाळा रोड आणि सीएसएमटी
ब्लॉक काळात भायखळा आणि सीएसएमटी आणि वडाळा रोड आणि सीएसएमटी दरम्यान लोकल धावणार नाही.
शेवटच्या लोकलचा तपशील
डाउन धिम्या मार्गावर-टिटवाळा ते सीएसएमटी येथून १०:५० वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे
१२:३३ वाजता पोहोचेल.
डाउन जलद मार्गावर-कसारा ते सीएसएमटी येथून १०:४७ वाजता सुटेल आणि कसारा येथे १:१२ वाजता पोहोचेल.
अप धिम्या मार्गावर-कल्याण येथून ९:१६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:४५ वाजता पोहोचेल.
अप जलद लाइनवर-कल्याण येथून १०:०२ वाजता सुटेल आणि ११:०४ वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
पनवेलसाठी डाउन मार्गावर- सीएसएमटी येथून १०:५८ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १२:१८ वाजता पोहोचेल.
गोरेगावसाठी डाउन मार्गावर- सीएसएमटी येथून १०:५४ वाजता सुटेल आणि गोरेगाव येथे
११:४९ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी अप मार्गावर-पनवेल येथून ९:३९ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:५८ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी अप मार्गावर- वांद्रे टर्मिनस येथून १०:२४ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे १०:५४ वाजता पोहोचेल.
ब्लॉक - २६ जानेवारी रात्री / रविवारी
वेळ - रात्री १२:३० ते ३:३०
अप-डाउन मार्गावर ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांत लोकल शॉर्ट टर्मिनेट होतील.
शेवटची लोकल
कर्जतसाठी डाउन धिम्या मार्गावर-सीएसएमटीहून १२:१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे २:३३ वाजता पोहोचेल.
अप धिम्या मार्गावर-सीएसएमटीहूनसाठी डोंबिवली येथून १०:४८ वाजता सुटेल आणि सीएसएमटीहून येथे १२:१० वाजता पोहोचेल.
पनवेलसाठी डाउन मार्गावर - सीएसएमटीहून येथून १२:१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे १:३३ वाजता पोहोचेल.
अप लाइनवर- सीएसएमटीसाठी पनवेल येथून १०:४६ वाजता सुटेल आणि सीएसएमटीहून येथे १२:०५ वाजता पोहोचेल.