समुद्रात आठवडाभर राहणार मोठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 01:43 AM2018-08-11T01:43:01+5:302018-08-11T01:43:24+5:30

पावसाळ्यात धडकी भरविणाऱ्या मोठ्या भरतीचा आठवडा शुक्रवारपासून सुरू झाला आहे.

Large recruitment will remain for weeks in the sea | समुद्रात आठवडाभर राहणार मोठी भरती

समुद्रात आठवडाभर राहणार मोठी भरती

Next

- शेफाली परब-पंडित 
मुंबई : पावसाळ्यात धडकी भरविणाऱ्या मोठ्या भरतीचा आठवडा शुक्रवारपासून सुरू झाला आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतल्यामुळे तूर्तास पाणी तुंबण्याचा धोका नाही. मात्र, लाटांबरोबरच समुद्रातील कचराही मोठ्या प्रमाणात बाहेर फेकला जात असल्याने, महापालिकेसमोर या रूपाने नवीन संकट उभे राहिले आहे.
मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेत आहेत. मात्र, मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिकेची यंत्रणा किनारपट्टीवर विशेष खबरदारी घेत असते.
मोठ्या भरतीच्या दिवशी सतर्कतेसाठी महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षामार्फत भरतीच्या दिवसांची यादी वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य प्राधिकरणांना पाठविण्यात येते. जेणेकरून अशा भरतीच्या दिवशीही मुंबईकर आणि संबंधित यंत्रणा सतर्क राहतील. या यादीनुसार १० ते १५ आॅगस्टपर्यंत समुद्रात सर्वाधिक ४.९६ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.
>२१५ मेट्रिक टन कचरा...
भरतीच्या दिवशी मरिन ड्राइव्ह, जुहू, दादर, माहीम आदी चौपाट्यांवर कचºयाचा ढीग येऊन पडला. हा कचरा तब्बल २१५ मेट्रिक टन इतका होता. दुपारच्या वेळीच ही मोठी भरती असल्याने मरन ड्राइव्ह येथील वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
यापैकी ९० मेट्रिक टन हा सर्वाधिक कचरा मरिन ड्राइव्ह, माहिम आणि दादर चौपाट्यांवर जमा झाला होता. जुहूमध्ये ७५ मेट्रिक टन, वर्साेवात १८ मेट्रिक टन, गोराईत १५ मेट्रिक टन कचरा निर्माण झाला होता. २०० मेट्रिक टन कचरा एका दिवसात जमा झाला होता.
>मोठ्या भरतीमुळे कचºयाचे संकट
गेल्या काही वर्षांमध्ये समुद्रात कचºयाचे प्रमाण वाढले आहे. हा कचरा मोठ्या भरतीच्या काळात उसळणाºया लाटांबरोबर किनारपट्टीवर येऊन धडकत आहे. १५ जुलै रोजी यंदाच्या मान्सून काळातील मोठी भरती होती. त्या वेळी समुद्रात ४.९७ मीटर उंच लाटा उसळून त्यासह कचºयाचा ढिग समुद्रकिनारी धडकला होता.
>...म्हणून घ्यावी लागते खबरदारी
या वर्षी २४ दिवस मोठ्या भरतीचे आहेत. या काळात मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळल्यास पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याचा मार्ग मंदावतो. यामुळे मुंबईची ‘तुंबापुरी’ होण्याची शक्यता असते.
>मोठ्या भरतीचे दिवस...
शुक्रवार दु. ११.११ वा. (४.६० मी.)
शनिवार दु. ११.५६ (४.८२ मी.)
रविवार दु. १२.४१ (४.९५ मी.)
सोमवार दु. ०१.२६ (४.९६ मी.)
मंगळवार दु. ०२.०८ (४.८५ मी.)
बुधवार दु. ०२.५२ (४.६२ मी.)

Web Title: Large recruitment will remain for weeks in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.