Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 22:56 IST2025-07-22T22:49:10+5:302025-07-22T22:56:22+5:30

Landslide On CSMT-Kasara local train: मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळून दुर्घटना घडली आहे.  हा अपघात कसारा रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. दरड कोसळून दगडमाती डब्यांमध्ये पडल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर  येत आहे.

Landslide hits CSMT-Kasara local train, 2 passengers injured | Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 

Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळून दुर्घटना घडली आहे.  हा अपघात कसारा रेल्वे स्टेशनजवळ झाला आहे. दरड कोसळून दगडमाती डब्यांमध्ये पडल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर  येत आहे. 

रात्री साडे नऊच्या सुमारास मुंबईहून कसाऱ्याला येणारी लोकल कसारा स्टेशनजवळ आली असताना रेल्वे रुळांजवळ असलेल्या डोंगरावरून दगड आणि मातीचा ढीग लोकलवर कोसळला. त्यातील काही दगड आणि माती ही दरवाजांमधून डब्यात शिरली. त्यावेळी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांपैकी दोन प्रवाशांना दुखापत झाली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 

Web Title: Landslide hits CSMT-Kasara local train, 2 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.