Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:12 AM2018-09-24T10:12:03+5:302018-09-24T10:27:02+5:30

Lalbaugcha Raja Visarjan: गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला. 

Lalbaugcha Raja : A boat sunk during Lalbaugcha Raja Visarjan | Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली

Lalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली

googlenewsNext

मुंबई - गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला. राजाच्या विसर्जनावेळी एक बोट समुद्रात बुडाल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. महिलेसह एका मुलगा उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान,पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीत भक्तिमय वातावरणात निरोप दिला.  तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. गेल्या 10 दिवसांपासून बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी  (23 सप्टेंबर) नाचत-गाजत निरोप देण्यात आला.  

विसर्जनापूर्वी लालबागच्या राजाची आरती

राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. त्यासोबत गणेशोत्सवाची सांगता झाली. मुंबईच्या चौपाटीवर हजारो भाविकांनी गर्दी केली होती.  ‘लालबागचा राजा’ ला निरोप देण्यासाठी दादरला समुद्र किनारी असंख्य भाविक गोळा झाले होते. गिरगाव चौपाटी, जुहू, पवई आणि दादर चौपाटी या गणेश विसर्जनाच्या मुख्य स्थळांकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. नागपुरात फुटाळा तलाव, नाईक तलाव, सक्करदरा तलाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेशविसर्जन झाले. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करून प्रशासनाने पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.


डीजे बंदीची कडक अंमलबजावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विसर्जन मिरवणुकीत डीजे बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक ध्वनी प्रदूषण होत असल्याचे दिसताच त्या मंडळाला सुरुवातीला अगोदर सूचना दिली जाते. तरीही त्यांना आवाज कमी केला नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. काही मंडळांचे मिक्सर पोलिसांनी जप्त केले आहेत. डीजे बंदीच्या अंमलबजावणीमुळे मिरवणुकीतील आवाज मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून, शहराच्या विविध उपनगरातून निघणाऱ्या मिरवणुकींमधील आवाजावर मर्यादा आल्या आहेत. आवाजावर मर्यादा आल्याने या मिरवणुकाही लवकर संपत असल्याचे दिसत आहे.

पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन
-कसबा गणपती सायंकाळी ४ वाजता
-तांबडी जोगेश्वरी ५.१४ वाजता
- गुरुजी तालीम ५.३२ वाजता
-तुळशीबाग ६.२५ वाजता
- केसरी मराठा ७.०५ वाजता

Web Title: Lalbaugcha Raja : A boat sunk during Lalbaugcha Raja Visarjan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.