रेस्टॉरंट चालकाच्या घरात लाखोंचा डल्ला, पसार जोडप्यास २४ तासात अटक
By गौरी टेंबकर | Updated: August 29, 2022 18:39 IST2022-08-29T18:38:38+5:302022-08-29T18:39:14+5:30
गौरी टेंबकर मुंबई: घरकाम करत असलेल्या ठिकाणाहून जवळपास साडे सात लाखांचा मुद्देमाल घेऊन मोलकरीण पतीसह पसार झाली. मात्र ओशिवरा ...

रेस्टॉरंट चालकाच्या घरात लाखोंचा डल्ला, पसार जोडप्यास २४ तासात अटक
गौरी टेंबकर
मुंबई: घरकाम करत असलेल्या ठिकाणाहून जवळपास साडे सात लाखांचा मुद्देमाल घेऊन मोलकरीण पतीसह पसार झाली. मात्र ओशिवरा पोलिसांनी अवघ्या २४ तासात त्या दोघांना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी वरिष्ठांकडून पथकाचे कौतुक करण्यात येत आहे. अटक आरोपींचे नाव नीलम एक्का (२५) आणि गोविंद रोहित राय (२८) अशी आहेत. ते दोघे पती पत्नी असुन एक्का ही आतिफ खान (३२) या रेस्टॉरंट व्यवसायिकाकडे घरकाम करत होती. तर राय हा रिक्षाचालक असुन जोगेश्वरीच्या बेहरामबाग येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी रात्री ३ च्या सुमारास या जोडप्याने खान यांच्या मिलेनियम कोर्ट इमारती मधील फ्लॅटच्या बेडरूम मधिल कपाटातील लाॅकर ७ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. ही बाब लक्षात येताच खान यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणी गुन्हा नोंद होताच तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक आनंद नागराळ व पथकाने तांत्रिक तपास करत बिहारच्या हाजीपुर मधून दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांना अटक करण्यासाठी पोलीस पथक याठिकाणी विमानाने दाखल झाले होते.