शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 05:12 PM2020-04-07T17:12:51+5:302020-04-07T17:13:19+5:30

तांदूळ, पामतेल, साखर आणि डाळ केव्हा उपलब्ध होईल? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

Lack of essentials at a grocery store | शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा

शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा

Next

 

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील सर्व शिधावाटप दुकानात फक्त गहू उपलब्ध आहे. तांदूळ, पामतेल, साखर आणि डाळ केव्हा उपलब्ध होईल? असा सवाल आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे.

महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन आहे. आज शिधावाटप दुकानात गहू उपलब्ध आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. अधिकारी खाजगीत सांगत आहेत की धान्य उचल करणारी यंत्रणा नसल्यामुळे सरकारी अधिकारी हतबल आहेत. गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांसकडे मागणी केली आहे की शिधावाटप दुकानात जीवनाश्यक वस्तुचा तुटवडा असून तो दूर करावा आणि सामान्यांना जीवनाश्यक वस्तुंचे वितरण करावे, 

करोना विषाणूचा पादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्या उपाय योजनांना जनता सहकार्य करीत आहे, मात्र लाँकडाऊनमुळे कामगार,गरीब जनतेचे मोठे हाल होत आहेत, त्यांचा रोजगार पुर्णपणे बुडाला आहे. घरातील पुंजी संपल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे  राज्य सरकारने त्यंच्या दोन वेळेच्या जेवनाची जबाबदारी घेतली पाहिजे.त्यासाठी राशन वाटपाची योजना चांगली आहे. मात्र त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली पाहिजे तरच त्याचा लाभ जनतेला होईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे.

Web Title: Lack of essentials at a grocery store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.