‘कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 06:10 AM2018-06-11T06:10:10+5:302018-06-11T06:10:10+5:30

कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली होत असून कामगार संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी कामगारांना भडकावण्यात येत असल्याचा व कामगारांची दडपशाही केली जात असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने केला आहे.

 'Kuwait Airways' worsens labor laws' | ‘कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली’

‘कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली’

Next

मुंबई  - कुवेत एअरवेजमध्ये कामगार कायद्यांची पायमल्ली होत असून कामगार संघटनांमध्ये फूट पाडण्यासाठी कामगारांना भडकावण्यात येत असल्याचा व कामगारांची दडपशाही केली जात असल्याचा आरोप फेडरेशन आॅफ आॅल इंडिया एव्हिएशनने केला आहे. फेडरेशनने याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे तक्रार केली आहे.
या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये तुटपुंजी वाढ केली जात असून कर्मचाºयांशी वैयक्तिकरीत्या संपर्क साधून वेतन वाढवल्याची औपरचारिकता केली जात आहे. गेल्या १४ वर्षांपासून कुवेत एअरवेजमध्ये कर्मचाºयांची वेतन पुनर्रचना झालेली नाही. याबाबत फेडरेशनने न्यायालयातही आक्षेप घेतला आहे.
कुवेत एअरवेज स्टाफ अ‍ॅण्ड आॅफिसर्स असोसिएशन या कंपनीमध्ये कार्यरत कामगार संघटनेला जाणीवपूर्वक दूर ठेवण्याचा प्रकार प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. कुवेत एअरवेजच्या कर्मचाºयांना धमकावून त्यांच्याकडून बळजबरीने प्रतिज्ञापत्राद्वारे आमचा कामगार संघटनेशी संबंध नाही, असे लिहून घेतले जात आहे. कर्मचाºयांच्या प्रश्नासाठी लढणाºया कामगार संघटनेला बाजूला सारून त्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप फेडरेशनने केला आहे. फेडरेशनचे अध्यक्ष प्रदीप मेनन, मुख्य संघटक सचिव किशोर चित्राव व सरचिटणीस नितीन जाधव यांनी या प्रकरणी सुरेश प्रभू यांच्याकडे निवेदन दिले असून प्रभू यांनी याबाबत हस्तक्षेप करून कर्मचाºयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे.

Web Title:  'Kuwait Airways' worsens labor laws'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.