Join us

ड्रायव्हर मोरेचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 09:34 IST

त्यानुसार ही कारवाई पुढे नेण्यात येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :  महाराष्ट्र परिवहन (आरटीओ) विभागाने ९ डिसेंबर रोजी झालेल्या बेस्ट बस दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बस ड्रायव्हर संजय मोरचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. वडाळा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोरेला परवाना रद्द करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार ही कारवाई पुढे नेण्यात येणार आहे. 

बस अपघातातील जखमी झालेल्या मेहेताब शेख याला सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  शेखला गंभीर दुखापत झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र  गुरुवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू सायन रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा नऊ वर गेला आहे. 

आम्ही सोमवारी ड्रायवर संजय मोरेला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसला दिलेल्या उत्तराच्या आधारे मोटार वाहन कायद्यांतर्गत पुढील कारवाई केली जाईल. - पल्लवी कोठावडे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी.

 

टॅग्स :कुर्ला