कुर्ला ते बीकेसी पाच मिनिटांत

By Admin | Updated: March 1, 2015 00:31 IST2015-03-01T00:31:15+5:302015-03-01T00:31:15+5:30

कुर्ला स्टेशन येथील एस़जी़ बर्वे मार्ग एलबीएस मार्गाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलास जोडण्यासाठी नवीन रस्ता बांधण्याचा प्रस्ताव नुकताच सुधार समितीने मंजूर केला़

Kurla to BKC in five minutes | कुर्ला ते बीकेसी पाच मिनिटांत

कुर्ला ते बीकेसी पाच मिनिटांत

मुंबई : कुर्ला स्टेशन येथील एस़जी़ बर्वे मार्ग एलबीएस मार्गाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलास जोडण्यासाठी नवीन रस्ता बांधण्याचा प्रस्ताव नुकताच सुधार समितीने मंजूर केला़ त्यामुळे दोन कि़मी़चा प्रवास अवघ्या पाच मिनिटांमध्ये होणार आहे़ परिणामी वाहनचालकांचे इंधन, पैसा व वेळ वाचणार आहे़
कुर्ला पश्चिम येथून वांद्रे-कुर्ला संकुलास जाण्यासाठी वाहनचालकांना सध्या एस़जी़ बर्वे मार्गावरून कुर्ला आगाराला वळसा घेऊन जावे लागत होते़ तसेच कुर्ला मार्केट येथील लियाकत अली मार्गावर असलेल्या डेव्हिड चाळीमुळे येथे वाहतुकीचा खोळंबा होत होता़ नवीन विकास आराखड्यानुसार २२११ चौ़मी़ क्षेत्रफळावर असलेल्या डेव्हिड चाळीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे़
त्यानंतर कुर्ला ते वांद्रे-कुर्ला संकुलाला जोडण्यासाठी नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे़ या प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नवीन रस्त्यामुळे प्रवास अवघ्या पाच मिनिटांमध्ये होणार असल्याने कुर्लावासीयांनाही दिलासा मिळणार आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Kurla to BKC in five minutes