Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला पोटाचा कॅन्सर झालाय, आता मी एक-दोन वर्षांचाच सोबती- कमाल खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 08:35 IST

मला पोटाचा कॅन्सर असून तो थर्ड स्टेजला असल्याची खात्री झाली आहे.

मुंबई: बॉलिवूड अभिनेता इरफान खान याने काही दिवसांपूर्वी त्याला न्युरो एंडोक्राइन ट्युमर झाल्याचे सांगितल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. ही घटना ताजी असतानाच आता वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेला कमाल खान यानेदेखील त्याला पोटाचा कॅन्सर असल्याचे सांगितले आहे. त्याने एक निवेदन प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे. आता मी केवळ एक-दोन वर्षांचा सोबती आहे, असेही कमाल खानने या निवेदनात म्हटले आहे. मात्र, कमाल खान याचा एकूणच प्रसिद्धीलोलूप स्वभाव पाहता या बोलण्यात कितपत तथ्य आहे, याविषयी अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. कमला खानने निवेदनात म्हटले आहे की, मला पोटाचा कॅन्सर असून तो थर्ड स्टेजला असल्याची खात्री झाली आहे. मी केवळ एक ते दोन वर्षे अजून जगू शकतो, असे मला वाटते. मी आता कुणाचा फोनही घेणार नाही आणि या जगातून लवकरच जाणार असल्याबद्दल कुणाला दुःखही व्यक्त करु देणार नाही. मला आता एका दिवसासाठीही कुणाची सहानुभूती नकोय. मला जे अजूनही शिव्या देतात, तिरस्कार करतात, त्यांचा मी आदर करतो. मी फक्त माझ्या दोन इच्छा आता पूर्ण होणार नाहीत, म्हणून नाराज आहे. एक म्हणजे मला निर्माता म्हणून ए ग्रेड सिनेमा प्रोड्यूस करायचा होता. दुसरे म्हणजे अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचं होतं. मात्र, आता माझ्या या दोन्ही इच्छा अपूर्णच राहणार आहेत. उर्वरित वेळ मी आता कुटुंबासोबत घालणार आहे. लव्ह यू ऑल, तिरस्कार करा, किंवा प्रेम! केआरके. दरम्यान, आता या निवेदनानंतर कमाल खान आपल्या आजाराविषयी आणखी काही भाष्य करणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :कमाल आर खानबॉलिवूड