Join us  

वडिलांना 'कृषीरत्न' पुरस्कार जाहीर, आमदार लेकानं असं केलं अभिनंदन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 9:49 AM

'कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - २०१९' बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला.

ठळक मुद्दे'कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - २०१९' बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला.

मुंबई - कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वडिलांना 2019 चा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंदर्भात स्वत: रोहित पवार यांनी ट्विटरवरुन माहिती दिली. तसेच, आपल्या वडिलांचे अभिनंदनही आमदार लेकानं केलंय. दरम्यान, राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेतीबारामतीत केली आहे. 

''कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा 'डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार - २०१९' बाबांना (राजेंद्र दादा पवार) जाहीर झाला. या सन्मानाबद्दल बाबांचं आणि इतरही वेगवेगळे पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांचं मनःपूर्वक अभिनंदन!', असे रोहित यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. रोहीत यांनी वडिलाचे शेतातील आणि शेतीसंबधित जोडधंद्यातील कामाचे फोटोही व्टिवटरवरुन शेअर केले आहेत. तसेच कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी सदैव काम करत असताना त्याची दखल अशा पुरस्काराच्या माध्यमातून घेतली जाते, तेंव्हा अधिक आनंद वाटतो. पुरस्कार जाहीर झालेले सर्व सन्माननीय भविष्यातही कृषी आणि  संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय काम करतील, असा विश्वासही व्यक्त केलाय. 

बारामती अॅग्रोचे प्रमुख राजेंद्र पवार 

बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन असलेले राजेंद्र पवार हे आमदार रोहीत पवार यांचे वडिल आहेत. बारामती अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी कृषी क्षेत्रात नव-नवीन प्रयोग केले आहेत. त्यांच्या, कृषीक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊनच राज्य सरकारच्यावतीने दिला जाणारा कृषीरत्न पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. यापूर्वीच्या सरकारमधील कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनीही बारामती अॅग्रोला भेट दिल्यानंतर राजेंद्र पवार आणि बारामीत अॅग्रोचं मोठं कौतुक केलं होतं.   

टॅग्स :रोहित पवारबारामतीशेतीट्विटर