कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:32 IST2019-09-06T06:31:51+5:302019-09-06T06:32:24+5:30
मुंबई : राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी राजभवनात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य ...

कोश्यारी यांनी मराठीतून घेतली राज्यपालपदाची शपथ
मुंबई : राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी राजभवनात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी कोश्यारी यांना शपथ दिली. कोश्यारी यांनी मराठीतून शपथ घेतली.राजभवनात झालेल्या राज्यपाल्यांच्या या शपथविधी समारंभास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
यासह राज्याचे तसेच उत्तराखंडचे काही मंत्री यांनीही ही समारंभास हजेरी लावली होती. उत्तराखंडचे वनमंत्री एच.एस. रावत, कृषिमंत्री सुबोध उनियाल, राज्यमंत्री रेखा आर्य, राज्यमंत्री डॉ. दान सिंह रावत हे आवर्जून उपस्थित होते. राज्याचे १९ वे राज्यपाल म्हणून भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी राजभवनात शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी कोश्यारी यांना शपथ दिली.