Konkan continues to be a warning signal | कोकणला मुसळधारेचा इशारा कायम
कोकणला मुसळधारेचा इशारा कायम

मुंबई : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ जुलै रोजी, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात १९ जुलै रोजी आणि २० व २१ जुलै रोजी कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविला आहे, तसेच पुढील २४ तासांत कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा इशाराही दिला आहे. मुंबईचा विचार केल्यास मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवासह शुक्रवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मान्सून पंजाब, हरियाणाच्या उर्वरित भागांत दाखल झाला आहे.


Web Title: Konkan continues to be a warning signal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.