Join us  

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मनस्ताप; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 12:25 PM

कोकण रेल्वेने जादा ट्रेन सोडल्यामुळे हा विलंब होत असल्याचे समजते.

मुंबई : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ट्रेन 5 ते 6 तास उशिराने धावत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोकण रेल्वेने जादा ट्रेन सोडल्यामुळे हा विलंब होत असल्याचे समजते.

कोकणात जाण्य़ासाठी बुधवारी रात्री गणेशभक्तांनी रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी केली होती. यामुळे स्लीपरच्या डब्यात पाय ठेवायलाही जागा नव्हती. अशातच ट्रेन उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आहेत. जादा ट्रेन सोडल्यामुळे रेल्वे प्रशासनाला त्यांचे नियोजन करणे अवघड जात आहे. यामुळे ट्रेनचे वेळापत्रक कोलमडले आहे.

दरम्यान, पनवेल ते पेणपर्यंतचा पट्टा सोडता मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बऱ्यापैकी बुजविण्य़ात आले आहेत. यामुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तरीही चौपदरीकरणाचे काम सुरु असल्याने वाहन चालकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :रेल्वेगोवामुंबईमहामार्ग