पूर्वीच्या भांडणातून चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:07 IST2021-03-09T04:07:26+5:302021-03-09T04:07:26+5:30

मुंबई : पूर्वीच्या भांडणातून मालाड परिसरात राहणारे शकील हुसेन यांच्या डोक्यावर चाक़ूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले ...

Knife attack from an earlier quarrel | पूर्वीच्या भांडणातून चाकूने हल्ला

पूर्वीच्या भांडणातून चाकूने हल्ला

मुंबई : पूर्वीच्या भांडणातून मालाड परिसरात राहणारे शकील हुसेन यांच्या डोक्यावर चाक़ूने वार केले. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. यात, ५ मार्च रोजी रात्री उशिराने ही घटना घडली असून, कुरार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

हत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

मुंबई : गोवंडी परिसरात राहणारे परवेज शेख (३५) हे मुलासोबत घरी जात असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गेल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहे. पूर्वीच्या भांडणातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

.......................

Web Title: Knife attack from an earlier quarrel