गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या मालवी मल्होत्रा (२९) या अभिनेत्रीवर चाकूने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी एका माथेफिरूवर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन चौकशी सुरू आहे.
सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अंधेरी पश्चिमच्या फिशरीज रोड फुटपाथवर हा धक्कादायक प्रकार घडला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. योगेश कुमार सिंग असे हल्लेखोराचे नाव असुन त्याच्यावर वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.