Join us
Daily Top 2Weekly Top 5

किशोरी पेडणेकर यांना ठार मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 09:11 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, यातील पेडणेकर यांना एक पत्र बंद लिफाफ्यात टपालच्या माध्यमातून पाठवून, त्यामध्ये अश्लील व घाणेरड्या भाषेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

मुंबई : माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना जिवे मारण्याच्या आलेल्या धमकीच्या पत्रानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एन.एम. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, यातील पेडणेकर यांना एक पत्र बंद लिफाफ्यात टपालच्या माध्यमातून पाठवून, त्यामध्ये अश्लील व घाणेरड्या भाषेत त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानुसार पेडणेकर यांनी एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चौकशीत उरणला राहणाऱ्या विजय मात्रे नावाच्या व्यक्तीने हे पत्र पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय मात्रे विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. 

सरकार पडू देत मग बघून घेऊ, असा उल्लेखही या पत्रातून केला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार पाडण्यास सांगितल्याचा उल्लेख या  पत्रातून करण्यात आला आहे.  

टॅग्स :किशोरी पेडणेकरशिवसेनापोलिस