Join us  

“आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली”; किशोरी पेडणेकरांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 4:25 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचारावरुन विरोधक सरकारची कोंडी करत आहेत. त्यातच आता विरोधी पक्ष भाजपाच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची तक्रार पुढे आल्यानं सत्तेतील तिन्ही पक्षांनी भाजपाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच आता शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला असून, आता खोटे रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली, असा खरमरीत सवाल केला आहे. (kishori pednekar criticised bjp over borivali women corporator case)

“अनंत गीतेंचे म्हणणे १०० टक्के खरे, शिवसेनेला हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही”

भाजपच्या महिला आता गप्प का? दिव्याखाली अंधार आहे. भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिला अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली, फोन बंद का, असे रोखठोक सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. 

“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा

स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार 

आता स्वत: बोरिवलीच्या प्रकरणात लक्ष घालणार आहे. पोलिस स्टेशनला जाणार आहे, असे सांगत केवळ महाराष्ट्र बदनाम करण्याचे काम भाजपकडून होत आहे. भाजपच्या ताई पब्लिक स्टंटसाठी पुढे येणार आणि आता गप्प बसणार? महिलांच्या विषयावर धाय मोकलून रडणाऱ्या भाजपच्या ताईंचा फोन सकाळपासूनच स्वीच ऑफ आहे, त्यांच्या पक्षातील कुणीच याबाबत बोलायला तयार नाही. कोणत्याही पक्षाची महिला असो, अन्याय होत असेल तर भूमिका घेतली पाहिजे, मी असते तर थोबाड फोडून टाकले असते, अशी घणाघाती टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

TATA ची कमाल! ‘ही’ कंपनी देतेय सलग तिसऱ्या वर्षी बोनस; हजारो कर्मचाऱ्यांची दिवाळी

दरम्यान, भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्याची तक्रार आमदार आणि खासदार यांच्याकडे केली म्हणून नगरसेविका आणि सहकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप समाजसेविकाने केला आहे. या विरोधात महिनाभरापूर्वी तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नाही. अखेर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे दाद मागितल्यावर बोरीवली पोलिसांनी एफआयआर दाखल केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. 

टॅग्स :राजकारणशिवसेनाकिशोरी पेडणेकरभाजपाचित्रा वाघबोरिवली