Join us  

Kisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 9:43 AM

मुंबईत शेतकरी मोर्चा पोहचताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मंत्र्यांची समिती नेमली.

मुंबई:  अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी नाशिकहून मुंबईपर्यंत काढलेला लाँग मार्च सोमवारी पहाटे मुंबईत दाखल झाला. या लाँग मार्चमध्ये तब्बल 30 हजाराहून अधिक शेतकरी सहभागी झाली आहे. 6 मार्चला नाशिकहून निघालेला हा मोर्चा 166 किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोहोचला आहे. रविवारी सोमय्या मैदानात विसावलेल्या या महामोर्चाने आज रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदान गाठले. शेतकऱ्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने मुंबईच्या दिशेने कूच केल्याने सरकारला गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच धडकी भरली आहे. त्यामुळे सरकार खडबडून जागे झाले असून शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेण्यासाठी एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ स्थापन केले आहे. या शिष्टमंडळासमोर आज शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींकडून आपल्या मागण्या मांडण्यात येतील. जाणून घेऊयात काय आहेत शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या.

* संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव.* स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी. *  वनाधिकार कायद्याचीही अंमलबजावणी करा. *  बोंड अळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी ४० हजार रुपये भरपाई द्यावी. *  वीज बीलमाफी मिळावी. *  ऊसाला हमीभाव बंधनकारक करावा. *  पश्चिमेत नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देण्यात यावे. *  नद्या जोड प्रकल्पांचा प्रश्न सोडवावा. *  संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ, श्रावणबाळ पेन्शन योजना.  *  कसत असलेल्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करा.*  दुधाला किमान ४० रुपये भाव मिळेल यासाठी तातडीने हस्तक्षेप करा*  साखरेच्या भावात हस्तक्षेप करून उसाला कारखान्यांनी हंगाम सुरू होताना जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा*  विकास कामांच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्याकडून काढून घेण्याचे कारस्थान बंद करा 

टॅग्स :किसान सभा लाँग मार्चशेतकरीभाजपादेवेंद्र फडणवीस