कुत्र्याला हटकल्याने तरुणाला मारहाण

By Admin | Updated: July 3, 2014 02:23 IST2014-07-03T02:23:18+5:302014-07-03T02:23:18+5:30

कुत्रा भुंकू लागल्याने त्याला हटकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. कुत्र्याच्या मालकाने रागाच्या भरात या तरुणावर प्राणघातक हल्ला केला.

Killing the dog hits the young man | कुत्र्याला हटकल्याने तरुणाला मारहाण

कुत्र्याला हटकल्याने तरुणाला मारहाण

मुंबई : कुत्रा भुंकू लागल्याने त्याला हटकणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. कुत्र्याच्या मालकाने रागाच्या भरात या तरुणावर प्राणघातक हल्ला केला. त्यात हा तरुण गंभीर जखमी झाला. काल रात्री बाराच्या सुमारास शिवडीच्या आझादनगर परिसरात ही घटना घडली.
संदीप इंद्रजित दबडे (२८) असे या तरुणाचे नाव असून, तो आझाद नगर सोसायटीत राहतो. काल रात्री बाराच्या सुमारास तो घरी परतत होता. इमारतीच्या गेटजवळ येताच राकेश शेषमन यादव (२८) यांचा कुत्रा संदीपवर भुंकू लागला, अंगावर येऊ लागला. यादव हेही याच सोसायटीत राहतात. स्वसंरक्षणार्थ त्यांच्या कुत्र्याला पळवून लावण्यासाठी संदीपने दगड उचलला आणि भिरकावला. हा प्रकार यादव यांनी पाहिला. कुत्र्याला दगड मारल्याने ते संतापले आणि संदीपच्या अंगावर धावून गेले. त्यांनी लोखंडी रॉड आणला आणि संदीपच्या डोक्यात घातला. त्यानंतरही त्याला रॉडने बरीच मारहाण केली. या हल्ल्यात संदीप गंभीर जखमी झाला. त्याला परळच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Killing the dog hits the young man