Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण

By मनीषा म्हात्रे | Updated: September 7, 2023 23:16 IST

एक्स्प्रेसच्या शौचालयात बसला होता लपून, नागपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलने केली सुटका

मुंबई : "पतीला तलाक दे म्हणत, प्रियकराने प्रेयसीच्या ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात घडला. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग सुरु केला. स्टेशन आले की तो एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये लपायचा. अखेर, शेगाव येथे शालिमार एक्स्प्रेस पोहचताच त्याला शौचालयातून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. रोतीन घोष (३५) असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

नागपाडा परिसरात २८ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ५ सप्टेंबर रोजी प्रियकर रोतीन घोष (३५) त्यांच्या ५ वर्षाच्या मुलीला घेऊन पसार झाल्याचे समजताच, रात्री उशिराने त्यांनी तात्काळ नागपाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.                नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी नाशिकमध्ये असल्याचे समजले. तो रेल्वेने गेल्याच्या शक्यतेतून पोलिसांनी एक्स्प्रेस तपासण्यास सुरुवात केली. मात्र त्यात तो मिळून आला नाही. पुढे तो लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शालिमार एक्स्प्रेसने गेल्याची माहिती हाती लागली. पथकाने हाच धागा पकडत, पाठलाग सुरु केला. गाडी जळगावपर्यंत पोहचताच एक्सप्रेसची तपासणी केली. मात्र, तो मिळून आला नाही. मात्र लोकेशन तेच येत असल्याने त्यांनी, त्यांनी शोध सुरु ठेवला. आरोपी शौचालयात लपत असल्याच्या शक्यतेतून त्यांनी, गाडी बुलढाणा शेगाव येथे पोहचताच शौचालयात शोध घेतला. तेव्हा, लपून बसल्याचे दिसून आला. पोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करत,  आरोपीला ताब्यात घेतले.

मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी पुन्हा सुखरूप कुशीत आल्याने आईनेही सुटकेचा निश्वास टाकला. नागपाडा पोलिसांनी आरोपीला अटक करत अधिक तपास करत आहे. 

 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस