Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : केतकीपाड्यातील युवकाची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:58 IST

दोन दिवसांपूर्वी येथील एक महिला कोरोनामुक्त झाली होती. त्यामुळे केतकीपाडा परिसर आता पूर्णत: कोरोनामुक्त झाला आहे.

मुंबई : दहिसर (पूर्व) केतकीपाडा येथे राहणारा एक ३१ वर्षीय युवक आज कोरोनामुक्त होऊन घरी परतला. दोन दिवसांपूर्वी येथील एक महिला कोरोनामुक्त झाली होती. त्यामुळे केतकीपाडा परिसर आता पूर्णत: कोरोनामुक्त झाला आहे.दरम्यान, आपल्यामुळे शेजाऱ्यांना नाहक त्रास झाल्याची खंत व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर, सर्व कर्मचारी व हितचिंतकांमुळे मी यावर मात केल्याचे या युवकाने सांगितले. शिवसेना शाखा क्रमांक ३चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो,’ असे आवाहन केले. त्यानुसार आपण अनावश्यक घराबाहेर न पडता कोरोनाची साखळी तोडायची आहे. या संकटसमयी महापालिका डॉक्टर, सफाई कामगार, पोलीस प्रशासन एकजुटीने याचा मुकाबला करत आहेत. आज खासगी दवाखाने बंद असताना महापालिकेचे दवाखाने सुरू आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस