Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ketaki Chitale: केतकीच्या अडचणीत वाढ; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, मात्र चेहऱ्यावर आजही स्मितहास्य कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 13:00 IST

आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करून दिली.

मुंबई/ठाणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. केतकीला ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिच्यावर कळवा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा करत होती. आज पोलीस कोठडीचा शेवटचा दिवस असल्याने तिला न्यायालयात हजर करून तिची वैद्यकीय तपासणी करून दिली. 

ठाणे सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर केतकीला ठाणे कारागृहात आणण्यात आले आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. तसेच विविध माध्यम प्रतिनिधी देखील त्याठिकाणी उपस्थित होते. केतकीचा यावेळीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही केतकीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आजही दिसून येत होतं.

गुन्हे शाखेनं केतकीची कस्टडी मागितली आहे. केतकीचा मोबाइल आणि लॅपटॉप सायबर शाखेकडे तपासणीसाठी देण्यात आला असून त्याचा अहवाल येणं अद्याप बाकी आहे. तो आल्यानंतर पुढील तपास करण्यात येईल त्यामुळे तिच्या कोठडीत आणखी वाढ करुन देण्याची मागणी पोलिसांनी केली होती. 

केतकीनं वकील घेतला-

केतकीनं याआधीच्या सुनावणीत कोणताही वकील घेतला नव्हता. तिनं स्वत:च न्यायालयासमोर आपली बाजू मांडली होती. पण यावेळी तिनं वकील घेतला असून अॅड. घनश्याम उपाध्यय केतकीची बाजू कोर्टासमोर मांडत आहेत. त्यांनी केतकीच्या जामीनासाठी देखील अर्ज दाखल केला आहे. 

टॅग्स :केतकी चितळेपोलिसठाणेशरद पवार