Join us  

नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशावर केसरकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 3:45 PM

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे.

मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाची चर्चा जोरदार रंगली आहे. त्यातच राणेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने शिवसेनेमध्ये अशांतता पसरल्याचे दिसून येत आहे. या भेटीनंतर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री व शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री व नारायण राणेंवर टीका केली आहे.

दीपक केसरकरांनी नारायण राणेंच्या भाजपा प्रवेशाबाबत सांगितले की, राणेंचा भाजपा प्रवेश म्हणजे दुधात मीठ टाकण्यासारखा प्रकार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगले संबंध असून, मला वाटत नाही की मुख्यमंत्री राणेंना भाजपात प्रवेश देतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे निर्णय घेतले आहेत ते योग्य होते. त्यामुळे मला विश्वास आहे की मुख्यमंत्री आतादेखील योग्य तोच निर्णय घेतील. 

नारायण राणेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशाबाबत भाष्य केले. त्यांनी सांगितले की, अमित शहांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतरही माझा भाजपामध्ये प्रवेश होऊ शकलेला नाही. आता येत्या दहा दिवसांमध्ये मी भाजपाबद्दल पुढील निर्णय घेणार आहे. या दहा दिवसांनंतर मी भाजपामध्ये असेन की माझ्या स्वत:च्या पक्षात असेन, हे स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले होते.

टॅग्स :भाजपानारायण राणे दीपक केसरकरशिवसेनाउद्धव ठाकरे