Join us
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश प्रक्रियेत अर्ज भरताना हे लक्षात ठेवा! शिक्षण विभागाकडून माहितीपूर्ण व्हिडीओ जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 10:50 IST

Admission: अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी यांनी  अर्ज भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई - अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी यांनी  अर्ज भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, याबाबतचा माहितीपूर्ण व्हिडीओ विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

विशेष करून मागच्या वर्षीच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जे-जे परिपत्रके, निर्देश जारी झाले, त्या मर्यादेत राहून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अर्ज भरताना कोणते नियम पाळावयाचे याबाबतच्या सूचना यात देण्यात आल्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेश कंकाळ यांनी लोकमतला सांगितले. तसेच, शासनाचा नवीन निर्णय जाहीर झाल्यावर त्यानुसार पुन्हा मार्गदर्शनपर व्हिडीओ प्रसारित करू, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. तसेच, युट्युबवर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया हा व्हिडीओ सर्व नागरिकांसाठी खुलादेखील केला आहे.

विद्यार्थ्यांनी काय करावे?प्रवेश पद्धत : गुणवत्तेनुसार व विविध प्रवर्गांतर्गत प्रवेश.महाविद्यालय निवड : भाग दोनमध्ये किमान १ ते कमाल १० महाविद्यालयांचा पसंतीक्रम.प्रवर्ग निवड : संबंधित महाविद्यालयाचा प्रवर्ग निवडता येतो; त्यानुसार गुणवत्ता यादी तयार होते. 

ऑनलाइन प्रवेशाचे टप्पे  ऑनलाइन नोंदणी करून मूलभूत माहिती भरणे.अर्ज भाग एक भरून प्रमाणित करणे.अर्ज भाग दोनमध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे.प्रवेश फेरीत सहभागी होणे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Eleventh Admission Process: Education Department Releases Informative Video Guide

Web Summary : The Education Department released a video guide for filling out eleventh admission forms. It outlines rules and instructions based on past government directives. Students should prioritize college choices and understand category-based merit lists. The video covers online registration, application completion, and participation in admission rounds.
टॅग्स :प्रवेश प्रक्रियाशिक्षण