Join us

सुरक्षा वाढविण्याची करुणा शर्मा यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 08:38 IST

करुणा शर्मा यांनी दिलेल्या पत्रात दसरा मेळावा केल्यास हल्ला होईल, प्राण गमवावे लागतील अशा धमक्या येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भगवानगडावर दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या येण्यास सुरुवात झाल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र देत सुरक्षेत  वाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

करुणा शर्मा यांनी दिलेल्या पत्रात दसरा मेळावा केल्यास हल्ला होईल, प्राण गमवावे लागतील अशा धमक्या येण्यास सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. तसेच त्यानुसार सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. या पत्रात आधी झालेल्या प्राणघातक हल्ल्याचाही उल्लेख केला आहे. त्यांना आलेल्या धमकीच्या क्रमांकावरून मुंबई पोलीस अधिक तपास करणार आहेत.

टॅग्स :मुंबईधनंजय मुंडे