'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकाणीला कन्यारत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:44 IST2017-11-30T16:51:12+5:302017-11-30T18:44:33+5:30

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Kaniratna in the opposite direction of 'Tarak Mehta' | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकाणीला कन्यारत्न

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वाकाणीला कन्यारत्न

मुंबई -  'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील दया भाभीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री दिशा वाकाणीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे.  आज 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दिशाने मुलीला जन्म दिला. 

खिचडीसारख्या विनोदी मालिकेत दिशाने अनेक छोट्या भूमिकांमध्ये झळकली होती. पण तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील दया या भूमिकेने तिला प्रेक्षकांचे प्रचंड लोकप्रियता मिळाली. दयाबेनने दिलेल्या आनंदाच्या बातमीमुळे तारक मेहता मालिकेच्या सेटवर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रत्येकजण दयाबेनवर शुभेच्छांचा वर्षाव करतोय. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील सगळेच कलाकार मंडळी सध्या दिशा वाकानीची भेट घेत आहेत. 

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि त्यामुळे या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना त्यांच्यातील एकच वाटू लागल्या आहेत आणि त्यातही या मालिकेतील दयाबेन ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. आज प्रेक्षक दिशाला द्याबेन म्हणूनच जास्त ओळखतात.  

  • दिव्यांका त्रिपाठीही लवकरच देणार बाळाला जन्म -

आता दया बेन पाठोपाठ दिव्यांका त्रिपाठीनेही गुड न्युज दिली आहे. ती प्रेग्नंट असल्याचे कळतंय. दिव्यांकाही लवकरच आई बनणार असल्याचं कळतंय.त्यामुळे दया बेन प्रमाणे इशी माँ म्हणजेच दिव्यांकाच्याही बाळाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. 

  • दिशाच्या डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमात कलाकारांची हजेरी - 

ऑक्टोबर महिन्यात मुंबईत दिशाचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. दिशाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. एवढेच नव्हे तर तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील तिचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू देखील या कार्यक्रमासाठी आर्वजून आला होता. या मालिकेत भाव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली होती. आज भाव्या या मालिकेत नसला तरी त्याचे दिशासोबतचे बाँडिंग कायम आहे. 

Web Title: Kaniratna in the opposite direction of 'Tarak Mehta'