कंगनाला उपरती! पालिकेविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे
By पूनम अपराज | Updated: February 10, 2021 15:48 IST2021-02-10T15:46:04+5:302021-02-10T15:48:18+5:30
kangana Ranaut Against BMC in High Court : निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

कंगनाला उपरती! पालिकेविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका घेतली मागे
कंगनाच्या खारमधील राहत्या फ्लॅटवर केलेल्या मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेली याचिका अखेर कंगनाकडून मागे घेण्यात आली आहे. बेकायदेशीर बदल नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे रितसर अर्ज करणारअसून कंगनाच्या अर्जावर चार आठवड्यांत निकाल देणं बीएमसीला बंधनकारक असणार आहे. जर निकाल कंगनाच्या विरोधात गेला तर कारवाईला दोन आठवड्यांची स्थगिती देण्यात देईल असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.
कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास त्या अनुषंगाने कार्यवाही दोन आठवड्यांपर्यंत करू नये, असे हायकोर्टाचे आदेश दिले. मुंबई महापालिकेकडे बांधकाम नियमित करून घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती मुंबई हायकोर्टात कंगनाने वकिलांमार्फत दिली आहे. खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविरोधातील याचिका अभिनेत्री कंगनाने अखेर मागे घेतली आहे.