Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राज्यपालांना भेटली ; मिळालेल्या अन्यायकारक वागणुकीचे मांडले गाऱ्हाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 04:30 IST

राज्यपाल हे एका अर्थाने आपले पालक आहेत. या भेटीदरम्यान माझ्याविरोधातील अन्यायकारक वागणुकीबद्दल त्यांना माहिती दिली.

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने रविवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुंबई महापालिकेने तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईसंदर्भात गाºहाणे मांडले. यावेळी बहीण रंगोलीही तिच्यासोबत होती.राज्यपाल हे एका अर्थाने आपले पालक आहेत. या भेटीदरम्यान माझ्याविरोधातील अन्यायकारक वागणुकीबद्दल त्यांना माहिती दिली. मला आशा आहे की न्याय मिळेल. लोकांचा विशेषत: मुलींचा व्यवस्थेवरील विश्वास कायम राहण्यासाठी ते आवश्यक आहे. मी कोणी राजकीय व्यक्ती नाही किंवा माझा राजकारणाशी संबंध नाही. पण, मुंबईसारख्या शहरात जिथे मी शुन्यातून सुरूवात केली, या शहराने खूप काही दिले. आता अचानक माझ्यासोबत जो अभद्र व्यवहार केला गेला त्यावर न्याय मिळावा अशी मागणी राज्यपालांकडे केली.आपल्या मुलीचे गाºहाणे ऐकावे अशा पद्धतीने राज्यपालांनी आमचे म्हणणे ऐकले, सहानुभूती व्यक्त केली, अशी माहिती कंगनाने या भेटीनंतर माध्यमांना दिली.

टॅग्स :कंगना राणौतभगत सिंह कोश्यारी