कमला मिल दुर्घटना : संचालकाची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 05:14 IST2018-02-03T05:13:55+5:302018-02-03T05:14:09+5:30
कमला मिल कम्पाउंडमध्ये २९ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कमला मिल कम्पाउंडचा संचालक रवी भांडारी याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा आपल्यावर नोंदवता येऊ शकत नसल्याचे म्हणत भंडारीने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

कमला मिल दुर्घटना : संचालकाची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
मुंबई : कमला मिल कम्पाउंडमध्ये २९ डिसेंबर रोजी झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कमला मिल कम्पाउंडचा संचालक रवी भांडारी याच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा आपल्यावर नोंदवता येऊ शकत नसल्याचे म्हणत भंडारीने गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा माझ्यावर नोंदविला जाऊ शकत नाही. फारतर निष्काळजी केल्याबद्दल गुन्हा नोंदवला जाऊ शकतो व हा गुन्हा जामीनपात्र आहे, असे रवी भंडारीने दाखल याचिकेत म्हटले आहे. न्या. बी. आर. गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने यावरील सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली आहे. मात्र, या याचिकेचा जामीन अर्जावर परिणाम होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.