Join us  

भायखळा विधानसभेसाठी शिवसेनेत तिकिटासाठी रस्सीखेच; अहिर यांच्या प्रवेशामुळे नाराजी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:17 AM

२०१४ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात मधु चव्हाण यांच्यासह भाजपचे मधु (अण्णा) चव्हाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण नसेचे संजय नाईक आणि ऑल इंडिया मुस्लीमचे अड. वारिस पठाण निवडणूक रिंगणात होते.

स्नेहा मोरे 

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या मतदार संघात सक्षम उमेदवारांचा शोध घेताना दिसत आहे. त्यातच, सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधून मजबूत इनकमिंग होत आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये भायखळा मतदार संघातही तिकिट मिळविण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरु आहे. यावेळी, मतदार संघात सेनेच्या उमेदवारीसाठी चढाओढ सुरु असून दुसरीकडे भाजपा, काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटी सुरु केल्या आहेत.सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे शिवसेनेत अंतर्गत नाराजी उफाळली असून सचिन अहिर यांच्यासाठी भायखळा मतदार संघावर शिक्कामोर्तब झाल्याने नाराजी समोर आली आहे. मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव नाराज असून यशवंत जाधव यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना मातोश्रीवरुन बोलावणे आले होते. उद्धव ठाकरे यांनी यशवंत जाधव यांना बोलावले होते. दरम्यान, भायखळा विधानसभा मतदार संघात यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या मतदार संघातील मुस्लिमबहुल मतदारांचा आपल्याकडे वळविण्यासाठी इच्छुकांनी वेगवेगळे मार्ग अवलंबिले आहेत. तर दुसरीकडे यशवंत जाधव, भाजपाच्या शायना एनसी यांनी थेट प्रत्येक चाळीतील मतदारांची भेट घेत समस्या जाणून घेण्याचा सपाटा लावला आहे.

२०१४ सालच्या निवडणुकीत या मतदारसंघात मधु चव्हाण यांच्यासह भाजपचे मधु (अण्णा) चव्हाण, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी, महाराष्ट्र नवनिर्माण नसेचे संजय नाईक आणि ऑल इंडिया मुस्लीमचे अड. वारिस पठाण निवडणूक रिंगणात होते. त्यात २५ हजार ३१४ मतांनी पठाण यांनी विजय मिळविला. मात्र निवडणुकीनंतर पठाण केवळ मुस्लिम बहुल मतदारांनाच उपलब्ध झाले ; परिणामी मराठी भाषिक मतदारांमध्ये आमदार गेली अनेक वर्ष दिसलाच नसल्याची भावना आहे.

मागील निवडणुकीत रोहिदास लोखंडे हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असल्यामुळे काँग्रेससमोर त्यांचे आव्हान होते तरीही राष्ट्रवादीच्या मतविभागणीचा तेवढासा फटका मधु (अण्णा) चव्हाण यांना बसला नव्हता. २०१४ सालच्या निवडणुकीत शिवसेनेने या ठिकाणी उमेदवार न देता अभासेच्या गीता गवळींना पाठिंबा दिला होता.यंदा मात्र सेनेकडून उमेदवारीसाठी चांगलीच लढत सुरु आहे. तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुलदीप पेडणेकर यांचा अर्ज बाद ठरला होता.यंदा मात्र मागील दहा वर्षांपासून माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि नगरसेवक म्हणून कामाची सुरुवात केलेल्या मनोज जामसुतकर निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. गेल्या या मतदार संघात मनसेने संजय नाईक यांना उमेदवारी दिली होती खरी पण यंदा मात्र मनसे मतदार संघात उमेदवाराच्या शोधात आहे. या मतदार संघातील माझगाव ताडवाडी परिसरात पूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर राहत असल्याने अजूनही येथील मनसैनिक एकनिष्ठ आहेत. या मतदार संघातील पुनर्विकास आणि वाहतूक कोंडीचा समस्या मोठी आहे. मतदार संघातील कित्येक चाळींचा पुनर्विकास गेली अनेक वर्ष शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे, येथील आरोग्य विषयक समस्याही मार्गी लावण्यात याव्यात अशी मतदारांची मागणी आहे.२०१४ विधानसभा निकाल पक्ष उमेदवार मतेएमआयएम वारिस पठाण २५,३१४भाजपा मधु (दादा) चव्हाण २३,९५७काँग्रेस मधु चव्हाण २२,०२१अभासे गीता गवळी २०,८९५मनसे संजय नाईक १९,७६२नोटा १,६२०मतदारसंघातील समस्याचाळींचा पुनर्विकासआरोग्यविषयक समस्याउद्यानांचे नूतनीकरण

टॅग्स :शिवसेनासचिन अहिरउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019