बस क्लीनरचा मुलीवर लैंगिक अत्याचार

By Admin | Updated: July 8, 2016 04:41 IST2016-07-08T04:41:08+5:302016-07-08T04:41:08+5:30

गोरेगावमधील एका प्रख्यात इंग्रजी शाळेच्या तीन वर्षीय विद्यार्थिनीवर लंैगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रशांत नामदेव मोडक (२७)

Just Cleaner's Girl Sexual Harassment | बस क्लीनरचा मुलीवर लैंगिक अत्याचार

बस क्लीनरचा मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : गोरेगावमधील एका प्रख्यात इंग्रजी शाळेच्या तीन वर्षीय विद्यार्थिनीवर लंैगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी प्रशांत नामदेव मोडक (२७) या बस क्लीनरला मंगळवारी अटक केली आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी एका महिलेने तिच्या ३ वर्षीय मुलीवर लंैगिक अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीची प्रकृती बिघडल्याने तिच्या आईने तिला डॉक्टरकडे नेले असता, तेथे या चिमुरडीवर लंैगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. हे सर्व कोणी केले, असा प्रश्न केला असता तिने ‘फोटोग्राफर अंकल’ असे उत्तर दिले. त्या वेळी पोलिसांनी अज्ञात आरोपीवर पॉस्को आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. या मुलीच्या शाळेत ओळखपत्रासाठी दोन दिवस फोटोग्राफीचे काम सुरू होते. हे काम करणाऱ्या त्या दोन्ही फोटोग्राफर्सना पोलिसांनी बोलावून घेतले. गेल्या १८ वर्षांपासून हे दोघे फोटोग्राफर शाळेत फोटोग्राफीचे काम करतात. पोलिसांनी शाळेचे सीसीटीव्ही फूटेज तपासले, त्यात प्रशांत मोडक हा काही दिवसांपासून गैरहजर असल्याचे तसेच त्याचा मोबाइल बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि त्याच्या कॉल लोकेशनवरून अखेर सावंतवाडी येथे दिंडोशी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Just Cleaner's Girl Sexual Harassment