लोकलसमोर उडी, मोटरमनने ब्रेक दाबून वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:25 IST2023-11-06T18:24:01+5:302023-11-06T18:25:27+5:30
कांदिवली स्थानकाजवळ लोकल ट्रेनसमोर उडी मारुन एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

लोकलसमोर उडी, मोटरमनने ब्रेक दाबून वाचवले प्राण
मुंबई-
कांदिवली स्थानकाजवळ लोकल ट्रेनसमोर उडी मारुन एका वृद्ध व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु पश्चिम रेल्वेच्या मोटरमनने तत्काळ ब्रेक दाबत त्या वृद्धाचे प्राण वाचवले. सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली. चर्चगेट ते बोरिवली लोकल ट्रेन चालवणाऱ्या मोटरमनने कांदिवली स्थानकात वृद्ध व्यक्तीला रुळांच्या जवळ आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहिले.
वेळेत ट्रेन थांबवली आणि तातडीने ट्रेन मॅनेजरला सूचना दिली. त्याचबरोबर त्याच ट्रेनमधील प्रवासी असलेल्या आणखी एका मोटरमनने सहप्रवाशांसह पीडित व्यक्तीला मदत करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. परंतु वृद्ध व्यक्ती रुळावरुन दूर गेली. रेल्वेत समोर येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार घडतात. परंतु २५० मीटर अंतर दिसले तर वेळेत ब्रेक दाबून प्राण वाचवता येतात पण कमी अंतर असेल तर प्राण वाचविणे कठीण होते असे एका निवृत्त मोटरमनने सांगितले.