Jumbo block between Borivali to Goregaon tomorrow | उद्या बोरीवली ते गोरेगावदरम्यान जम्बो ब्लॉक

उद्या बोरीवली ते गोरेगावदरम्यान जम्बो ब्लॉक

मुंबई : बोरीवली आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान देखभालीच्या कामांसाठी रविवारी, २४ नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेच्या कामांसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत अप आणि डाउन धिम्या मार्गावर पश्चिम रेल्वेतर्फे जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. या काळामध्ये अप आणि डाउन धिम्या मार्गावरील लोकल गाड्या जलदगती मार्गावरून नेण्यात येणार आहेत. त्यामुळे जलद गाड्यांचे वेळापत्रकही कोलमडण्याची शक्यता आहे, तसेच अनेक गाड्या रद्द केल्या जाण्याचीही शक्यता आहे. या ब्लॉकच्या काळात बोरीवलीच्या १, २, ३ आणि ४ क्रमांकाच्या फलाटावरून एकही गाडी सुटणार नाही, असेही पश्चिम रेल्वेने कळविले आहे. यामुळे या ब्लॉकची वेळ लक्षात घेऊन प्रवास करावा, असेही पश्चिम रेल्वेद्वारे सांगण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Jumbo block between Borivali to Goregaon tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.